Home आरोग्य संभाजीनगर शहरात श्री सद्स्यांनी राबवले व्यापक स्वच्छता अभियान (व्हिडीओ)

संभाजीनगर शहरात श्री सद्स्यांनी राबवले व्यापक स्वच्छता अभियान (व्हिडीओ)


12222340 2842 41c0 89cc 91a633e8f90e

संभाजीनगर (औरंगाबाद) (राहुल मराठे) स्वच्छतादूत आणि पद्मश्री पुरस्काराने सन्मानित आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्ताने आज (दि.१२) संपूर्ण संभाजीनगर (औरंगाबाद) शहरात व्यापक स्वच्छता अभियान राबवण्यात आले. या महास्वच्छता अभियानासाठी सुमारे ४० ते ५० हजार श्री समर्थ बैठकीचे श्री सद्स्य गावोगावहून स्वखर्चाने उपस्थित होते.

 

संपूर्ण संभाजीनगर शहरात सकाळी ७.०० वाजेपासून स्वच्छता अभियानास प्रारंभ करण्यात आला. त्यात सहभागी होण्यासाठी जळगांव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, पंढरपूर, मध्यप्रदेश येथुनही श्री सदस्य आले होते. संपूर्ण शहर स्वच्छ करून चकचकीत केले गेले. श्री सद्स्यांनी महापालिकेच्या सहकार्याने हे अभियान राबवले, हजारो टन कचरा यावेळी शहरातून गोळा करण्यात येवून बाहेर काढण्यात आला. स्वच्छता अभियान आटोपल्यावर श्री सद्स्यांना निरोप देण्यात आला. त्यावेळी विचारमंचावर संभाजीनगर येथील खासदार चंद्रकांत खैरे यांनी सर्वांचे आभार मानले व विचार मंचावर नतमस्तक होऊन सगळ्यांना अभिवादन केले. यावेळी महापौर, आमदार, प्रशासकीय अधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.

 

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound