रावेर – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | रावेर तालुक्यात केळीच्या पिकांच्या नुकसानीचा धडाका सुरुच असून तिस-यांदा झालेल्या वादळी पावसामुळे केळी पिकाचे मोठे नुकसान झाल्याचे वृत्त आहे. यामुळे शेतकरी वर्ग हवालदील झाला आहे.
रावेर तालुक्यात केळीच्या पिकांच्या नुकसानीचा धडाका सुरुच आहे. तिस-यांदा झालेल्या वादळी पावसामुळे पातोंडी, बोहर्डे, पुनखेडा, भोर या पट्यात मोठे नुकसान झाले असून अनेक झाडे उन्मळून पडल्याने पातोंडी रावेर मार्गे बंद आहे. केळी पिकाचे मोठे नुकसान झाल्याचे वृत्त असून यामुळे शेतकरी वर्ग हवालदील झाला आहे.
आज सायंकाळी झालेल्या वादळी पावसामुळे शेकडो हेक्टर वरील केळी पुन्हा भुईसपाट झाली आहे. रावेर तालुक्यात मागील दहा दिवसात तिस-यांद्या केळी पिकाची मोठी हानी झाली आहे.वादळासह जोरदार पाऊसदेखील पडल्याने काहीसा गारवा निर्माण झाला.
आज घटनेची माहिती समजताच शेतकरी संदीप सावळे यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना झालेल्या नुकसानीची माहिती दिली. सायंकाळी झालेल्या वादळी पावसामुळे विनोद पाटील, नारायण धनगर, भगवान बोरसे, विलास बोरसे जगन्नाथ बोरसे, समाधान पाचपोळे, लक्ष्मण सावळे, स्वप्नील सावळे, अशोक पाटील, हरीश पाटील, डॉ गुलाब पाटील, हिम्मतराव पाटील, विजय कौतिक पाटील, बिजलाल लवंगे, पंकज सपकाळे या शेतक-यांचे मोठे नुकसान झाल्याचे वृत्त आहे.