Home क्राईम सिंधी कॉलनीत बंद घर फोडून दुचाकीसह मुद्देमाल लांबविली

सिंधी कॉलनीत बंद घर फोडून दुचाकीसह मुद्देमाल लांबविली

0
54

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील सिंधी कॉलनीतील बंद घर फोडून अज्ञात चोरट्यांनी दुचाकीसह पाणीपुरीची गाडी आणि गॅस सिलेंडर चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, हिम्मतसिंग जगतसिंग (वय-२५) रा. कला भवन सिंधी कॉलनी हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. पाणीपुरीचा व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करतात. १३ मे रोजी सांयकाळी ४ ते २८ मे सायंकाळी ४ वाजेच्या दरम्यान घर बंद करून ते गावाला गेले होते. घर बंद असल्याचा संधीचा फायदा घेवून अज्ञात चोरट्यांनल बंद घर फोडून घरातील दुचाकीसह पाणीपुरीची गाडी आणि गॅस सिलेंडरची चोरी केली. हिम्मतसिंग जगतसिंग हे घरी आल्यावर हा प्रकार लक्षात आला. शुक्रवार १० जून रोजी त्यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ महेंद्र पाटील करीत आहे.

 


Protected Content

Play sound