अमळनेर – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । तालुक्यातील पातोंडा येथे शुक्रवारी वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. पहिल्याच पावसाने अक्षरश: दाणादाण उडवली असून रस्त्यावर झाडे कोसळल्याने विदुयत पोल वाकून वीज पुरवठा खंडित झाला होता.
वादळी वाऱ्यामुळे अनेक भागांत झाडांच्या फांद्या पडल्या असून मुख्य बाजारपेठ परिसरात विदुयत पोलवर झाड उन्मळून पडल्याने वीज पुरवठा खंडित झाला होता. जून महिना उजळून पहिल्या आठवडा उलटूनही पाऊस होत नसल्याने शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे खिळल्या होत्या.शेतीची मान्सूनपूर्व मशागती बाकी असल्याने शेतकरी वर्ग चिंतेत होता. उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढतच होता. व उष्णतेची लाट व उन्हाच्या घामामुळे नागरिकही वैतागले होते.
अखेर पहिल्या पावसाची चांगली सुरवात झाल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे. काल सायंकाळच्या सुमारास वादळी वारा व विजेचा गडगडाट करत पावसाला सुरुवात झाली. अनेक भागांत झाडांच्या फांद्या पडल्यात. तर मुख्य बाजारपेठ परिसरात एका विद्युत पोलवर झाड उन्मळून पडल्याने विदुयत पोल वाकून वीज पुरवठा खंडित झाला होता.
पातोंडा ग्राम पंचायतीने मान्सूनपूर्वी गावातील गटारी बाहेरून मजूर मागवून काढल्या. त्यांच्या ह्या कृत्याचे गावकऱ्यांनी कौतुक केले मात्र गटारीतून काढलेला गाळ व घाण न उचलल्याने पडलेल्या पावसात तीच घाण गटारीत जाऊन मिळाली. तरी ग्राम पंचायतीने गटारीतून काढलेली घाण वाहून नेण्याची ग्रामस्थांनी मागणी केली आहे.