Home Cities अमळनेर आनोरे गावाला मंगळग्रह संस्थेतर्फे ५० हजारांची मदत

आनोरे गावाला मंगळग्रह संस्थेतर्फे ५० हजारांची मदत

501cc3e4 fa04 487a b9f3 9b4f13bbaa19
501cc3e4 fa04 487a b9f3 9b4f13bbaa19

501cc3e4 fa04 487a b9f3 9b4f13bbaa19

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील आनोरे गावाने पाणी फांउडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत सहभाग घेतला आहे. स्पर्धेसाठी करावयाच्या विविध कामांसाठी त्या गावाला मदत म्हणून येथील मंगळग्रह सेवा संस्थेने शुक्रवारी सायंकाळी प्रांताधिकारी सीमा अहिरे यांच्या हस्ते त्यांना ५० हजार रुपयांचा धनादेश दिला आहे.

 

आनोरे विकास मंचतर्फे हा धनादेश शेनपडू आनंदा पाटील, सुनील नारायण पाटील, हिंमत यशवंत पाटील यांनी स्वीकारला. सिमा अहिरे यांनी मंगळग्रह सेवा संस्थेच्या या सत्कार्याबद्दल त्यांचे यावेळी कौतूक केले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष डिगंबर महाले, उपाध्यक्ष एस.एन. पाटील, सहसचिव दिलीप बहिरम, खजिनदार गिरीश कुलकर्णी, विश्वस्त अनिल अहिरराव आदी उपस्थित होते. दरम्यान आनोरे गावास मंगळग्रह सेवा संस्थेने एका वर्षासाठी दत्तक घेतले आहे. या वर्षभराच्या कालावधीमध्ये सर्वांच्या सहकार्याने आनोरे गावात अभूतपूर्व लोकाभिमूख उपक्रम राबविणार असल्याची माहिती डिगंबर महाले यांनी यावेळी दिली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound