Home Cities जळगाव शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा

शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा

0
124


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | विवेकानंद प्रतिष्ठान पुरस्कृत के. ए. के. पी वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात शिवराज्याभिषेक दिन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला.

 

आज संपूर्ण देशातच नव्हे तर जगात सर्व शिवप्रेमींच्या वतीने शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात येत आहे. या पवित्र दिनाचे औचित्त्य साधून महाविद्यालयात देखील या सोहळ्यानिमीत्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे तसेच महाराजांच्या चारित्रांवर आधारित पुस्तकांचे देखील पूजन करण्यात आले. यावेळी आपल्या संबोधनात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर पाठक यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याला नमन करत आजच्या तरुणांनी शिवाजी महाराजांच्या कार्यातून प्रेरणा घ्यावी असा संदेश दिला. कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर पाठक, ग्रंथपाल प्रा. हितेश ब्रिजवासी, हितेंद्र सरोदे, मुरलीधर चौधरी तसेच सचिन मावळे आदी उपस्थित होते.


Protected Content

Play sound