Home क्राईम दोन लाखांसाठी विवाहितेचा छळ

दोन लाखांसाठी विवाहितेचा छळ

0
115


जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । हुंड्यांच्या पैशांसाठी विवाहितेचा मानसिक व शारिरीक छळ केल्याची प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याविषयी अधिक माहिती अशी की, “शहरातील भूषण कॉलनीतील माहेरवाशीन विशाखा किरण महाजन यांचा विवाह किरण रमेश महाजन यांच्याशी झाला. पतीसह सासरच्यांकडून हुंड्यांच्या पैशांसाठी वारंवार विवाहितेचा छळ केला जात होता. हा त्रास असह्य झाल्याने विवाहिता आपल्या माहेरी निघून आल्या. दरम्यान, शुक्रवारी त्यांनी रामानंदनगर पोलीस ठाणे गाठत तक्रार दिली.

त्यानुसार पती किरण रमेश महाजन, सासरे रमेश पंडीत महाजन, सासू सुलभा रमेश महाजन, राकेश महाजन, कोमल महाजन, सुधाकर महाजन, साधना सुधाकर महाजन सर्व रा. डोंबविली यांच्यावरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.” पुढील तपास सुनिल पाटील हे करीत आहे.


Protected Content

Play sound