यावल – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । तालुक्यातील डांभुर्णी गावचे रहिवासी असलेले आणि स्वयंदीप प्रतिष्ठानचे संस्थापक सचिव संदीप पाटील (सोनवणे) यांची महाराष्ट्र शासनाच्या जिल्हास्तरीय बाल कल्याण समितीच्या सदस्यपदी निवड झाली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या जिल्हास्तरीय कार्यक्षेत्र असलेल्या या बाल कल्याण समितीअंतर्गत १७ वर्षच्या वयाखालील मुलांची काळजी आणी संरक्षणाची गरज असलेल्या बालकांचे सर्वांगीण विकास पुर्नवसन आणी सर्वच स्तरावर त्यांना न्याय मिळवुन देण्यासाठी बाल न्याय (मुलांची काळजी संरक्षण) अधिनियम २०१५ नुसार प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी म्हणुन असलेल्या अधिकाराचा वापर करून सदरची ही समिती काम पाहते. महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या आदेशावरून राज्यशासनाचे सहसचिव श. ल. आहिरे यांनी समितीच्या जिल्हा अध्यक्ष देवयानी मनोज गोविदवार यांच्या मार्गदर्शनाखाली असलेल्या या बाल कल्याण समितीवर संदीप पाटील (सोनवणे) यांची निवड करण्यात आली आहे. संदीप पाटील राहणार डांभुर्णी तालुका यावल यांच्या या समिती सदस्य म्हणुन निवडीचे सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे.