जळगाव प्रतिनिधी । महाराष्ट्र गवळी समाज संघटनेचे प्रदेशाध्यक्ष दिवंगत किसनराव हुंडीवाले यांना आज येथील समाजबांधवांतर्फे आदरांजली अर्पण करण्यात आली.
याबाबत वृत्त असे की, महाराष्ट्र गवळी समाज संघटनेचे प्रदेशाध्यक्ष किसनराव हुंडीवाले यांची अकोला येथे दिनांक ६ मे रोजी क्रूर हत्या झाली. यामुळे समाजात शोकयुक्त संताची लाट उसळली आहे. या अनुषंगाने महाराष्ट्र गवळी समाज संघटना, जळगाव विरशैव लिंगायत गवळी समाज,जय सिदाजीआप्पा गवळी समाज बहूउद्धेशिय संस्था, मोहाडी, महाराष्ट्र गवळी समाज महासंघ शाखा जळगाव. यांच्या संयुक्त विद्यमाने शोकसभा घेऊन स्व.किसनराव हुंडीवाले यांना भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली.
याप्रसंगी म.ग.स.संघटनेचे जिल्हाध्यक्ष, दिलीप गवळी, उपाध्यक्ष निंबा जानगवळी, तालुकाध्यक्ष विठ्ठलराव यालबोल, युवा जिल्हाध्यक्ष राजेंद्र जानगवळी, युवा उपाध्यक्ष संजय वाडिकर,युवा तालुका अध्यक्ष संतोष जानगवळी,उपाध्यक्ष अनिल उदिकर, सचिव दिपक जोमिवाळे, जिल्हा संपर्क प्रमुख कृष्णा गठरी, वरीष्ठ युवा कार्यकर्ते उमेश गठरी, रविंद्र परळकर, हेमंत वाडिकर तसेच समाजातील वरीष्ठ सामाजिक कार्यकर्ते पिरनआप्पा पिरनाईक, पैलवान रामाजी गठरी, शंकरराव बारसे, महादू जानगवळी, निवृत्ती मिसाळ आदींसह समाजबांधवांची उपस्थिती होती.