जुन्या भांडणाच्या कारणावरून तरूणाला लोखंडी आसारीने मारहाण

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील शिरसोली येथे जुन्या भांडणाच्या कारणावरून तरुणाला लोखंडी आसारी डोक्यावर मारून गंभीर दुखापत केल्याची घटना देवकर महाविद्यालयाच्या मागील रस्त्यावर घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एमआयडीसी पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, योगेश घनश्‍याम पाटील (वय-३५) रा. शिरसोली ता. जळगाव हा तरुण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. मंगळवारी ३१ मे रेाजी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास योगेश पाटील हा दुचाकीने देवकर महाविद्यालयाच्या मागे असलेल्या शिरसोली रस्त्यावरून जात होता. त्यावेळी रविंद्र लक्ष्‍मण बुंदे रा. शिरसोली व त्याच्या सोबत इतर अनोळखी तीन जण यांनी योगेश पाटील यांची दुचाकी अडवली. मागील भांडणाच्या कारणावरून रवींद्र बुंदे हातातील लोखंडी आसारी योगेश पाटील यांच्या डोक्यात टाकून गंभीर दुखापत केली व सोबत असलेल्या तीन अनोळखी व्यक्तींनी पायावर लोखंडी पाईपने मारहाण केली. जखमी झालेल्या योगेशला तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. योगेश पाटील यांनी  त्यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात रवींद्र लक्ष्‍मण बुंदे रा. शिरसोली ता. जळगाव यांच्यासह अन्य तीन अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल जितेंद्र राठोड करीत आहे.

 

 

Protected Content