Home धर्म-समाज पाचोरा आगारात लालपरीचा वर्धापनदिन उत्साहात

पाचोरा आगारात लालपरीचा वर्धापनदिन उत्साहात

0
35

पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । महाराष्ट्र लोकवाहिनी लालपरीचा ७४ वा वर्धापन दिन पाचोरा आगारा व्यवस्थापक निलिमा बागुल यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.

आगारातील लालपरीसह संपूर्ण आगारास फुलहारांनी सजवत, केक कापून तसेच दिप प्रज्वलन करून वर्धापनदिन साजरा करण्यात आला.

याप्रसंगी अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे जिल्हाध्यक्ष डॉ. अनिल देशमुख, ता. संघटक शरद गीते, उपाध्यक्ष संजय पाटील, परिवहन समिती अध्यक्ष सुरेश तांबे, अन्न व औषध प्रशासन समिती प्रमुख गिरीश दुसाने, कृषी समिती अध्यक्ष एन. आर पाटील, सदस्य डॉ. दिनेश सोनार, यांनी वर्धापनदिनाच्या शुभेच्छा शुभेच्छा दिल्या.

यावेळी सहाय्यक कार्यशाळा अधिक्षक योगेश जाधव, वाहतूक निरीक्षक प्रयास पाटील, राहुल नजन, सहाय्यक वाहतूक निरीक्षक गणेश पाटील, वाहन परिक्षक महेश्वर पाटील, वाहक प्रमिला जाधव, सुजाता सुरळकर, वरिष्ठ लिपीक कनकमल सोनार, वाहतूक नियंत्रक संजय बोरसे सह चालक, वाहक उपस्थित होते. यावेळी कडगांव ता. जि. जळगांव येथील जेष्ठ प्रवाशी नारायण पाटील व जेष्ठ वाहक अविनाश जोशी यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

 


Protected Content

Play sound