Home Cities जळगाव म्हसावद येथे अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन

म्हसावद येथे अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन

0
116

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील म्हसावद येथे अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.

जळगाव तालुक्यातील म्हसावद येथील ग्रामपंचायत कार्यालयात अहिल्याबाई होळकर जयंती साजरी करण्यात आली. यावेळी सरपंच गोविंदा पवार यांच्याहस्ते अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

यावेळी सरपंच गोविंदा पवार यांनी अहिल्याबाई होळकर यांचे जीवन चरित्र भारतातील अहिल्याबाई होळकर अभिषेक दानशूर कर्तृत्ववान व कायदेशीर सल्लागार व भारतातील जागीरदार म्हणून त्यांची मोठी ओळख असल्याचे सांगितले.

याप्रसंगी उपसरंपच विकी चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य शितल चिंचोरे, बाबा चिंचोरे, दिपक चिंचवडे, मधुकर पाटील, अखिल पटले, दगा कोळी, इंदू भोई, सुनिल अहिरे, अशोक हुजरे, नितीन मोरे, विजय कापुरे, पत्रकार दिपक महाजन यांच्यासह आदी उपस्थित होते.


Protected Content

Play sound