Home क्राईम सीटी हॉस्पिटलजवळून दुचाकीची चोरी

सीटी हॉस्पिटलजवळून दुचाकीची चोरी

two wheelar thift

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील सीटी हॉस्पिटलजवळून तरूणाची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, योगेश संजय सरदार (वय-२६) रा. वाघनगर जळगाव हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. खासगी नोकरी करून आपला उदरनिर्वाह करतात. २८ मे रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास हे वयक्तिक कामासाठी गोविंदा रिक्षा स्टॉप येथील सीटी हॉस्पिटल जवळ दुचाकीने आले होते. त्यावेळी त्यांनी त्यांची बजाज पल्सर वाहने हे हॉस्पिटलजवळ पार्कीग करून लावलेली होती. अज्ञात चोरट्यांनी २० हजार रूपये किंमतीच बजाज पल्सर चोरून नेली. त्यांनी त्यांच्या दुचाकीचा परिसरात शोधाशोध केली परंतू दुचाकी कुठेही आढळून आली नाही. अखेर सोमवारी ३० मे रोजी शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक प्रफुल्ल धांडे करीत आहे.


Protected Content

Play sound