Home क्राईम पिंप्राळ्यातून एकाची दुचाकी लांबविली

पिंप्राळ्यातून एकाची दुचाकी लांबविली


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील पिंप्राळा परिसरातून एकाची घरासमोरून दुचाकी लांबविल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, प्रदीप शांतीलाल कदवाने (वय-५८) रा. सेंट्रल बँक कॉलनी, पिंप्राळा रोड जळगाव हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. २६ मे रोजी सकाळी ११ वाजता त्यांनी त्यांच्या मालकीची (एमएच १९ बीई १८७२) क्रमांकाची दुचाकी घरासमोर पार्क करून लावली होती. अज्ञात चोरट्याने ९ हजार रूपये किंमतीची दुचाकी चोरून नेली. हा प्रकार २७ मे रोजी सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास उघडकीला आला आहे. प्रदीप कदवाने यांनी परिसरात दुचाकीचा शोधाशोध केली परंतू दुचाकी कुठेही आढळून आली नाही. अखेर रविवारी २९ मे रोजी सकाळी रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक जितेंद्र तावडे करीत आहे.

 


Protected Content

Play sound