रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यात चोरट्यांना धुमाकूळ सुरूच असून उटखेडा,रमजीपुर,नंतर चोरट्यांनी आपला मोर्चा अहीरवाडीकडे वळविला असून येथील घर फोडुन लाखोंचा ऐवज लंपास केल्याची घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
या बाबत वृत्त असे की अज्ञात चोरट्यांच्या टोळीने अहीरवाडी (ता रावेर) बाहीरपूरा भागात रहीवासी असलेले रमेश शामराव महाजन यांच्या घरामध्ये खिडकी तोडून अनअधिकृत पणे प्रवेश केला.व घरात असलेले सुमारे एक लाखाच्या वर रोख रक्कम तर सुमारे दहा तोळ्याच्या वर सोन्याचे दागीने चोरुन नेले आहे.यामुळे गावात एकच खळबळ उडाली असुन पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहे.

दरम्यान, या चोरीत सुमारे सात लाखांच्या वर चोरी करण्यात आल्याची प्राथमिक माहिती हाती आली असून शेवटचे वृत्त आले तेव्हा या प्रकरणी पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.


