जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । दोन वेगवेगळ्या घटनेत भरधाव वेगाने वाहन चालवून दुचाकीला धडक देवून दुचाकीस्वारांना जखमी केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी कार चालकाविरुद्ध रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील रामानंदनगर परिसरातील शास्त्री नगरातील आदित्य गणेश गुळवे हा तरुण गोल्ड जीमजवळून जात होता. याचवेळी भरधाव वेगाने जाणार्या (एमएच १९ १७९८ क्रमांकाच्या) चारचाकी वाहनाने त्या तरुणाला धडक दिली. या अपघातात आदित्य गुळवे याच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. त्याच्या तक्रारीवरुन कार चालकाविरुद्ध रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उषा सोनवणे या करीत आहे.
वाहनाच्या धडकेत महिला जखमी –
शहरातील खंडेराव नगरातील दिक्षा किशोर बुवा ही महिला शिवकॉलनी स्टॉपसमोरुन दुचाकीने जात असतांना या ठिकाणाहून (एमएच १९ डीएस ११९४ क्रमांकाच्या) चारचाकी वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातात दिक्षा बुवा यांच्या उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरुन रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास प्रशांत पाठक हे करीत आहे.