Home धर्म-समाज नरेंद्र नारखेडे नवरत्न पुरस्काराने सन्मानित

नरेंद्र नारखेडे नवरत्न पुरस्काराने सन्मानित

0
39

फैजपूर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । येथील नरेंद्र विष्णू नारखेडे यांना शिर्डी येथे राज्यस्तरीय नवरत्न पुरस्कार २०२२ प्रदान करून गौरविण्यात आले.

शिर्डी येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचा राष्ट्रीय १८ वे अधिवेशन व गौरव समारंभ उत्साहात संपन्न झाला. यावेळी राजकीय सहकार व आध्यात्मिक क्षेत्रात उल्लेखनीय उत्कृष्ठ सामाजीक कार्य केल्याबद्दल हा राज्यस्तरीय नवरत्न पुरस्कार राज्याचे माजी विरोधीपक्ष नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील व साईबाबा संस्था शिर्डीचे मा.अध्यक्ष व खासदार भाऊसाहेब खासदार वाकचौरे यांचे हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा कार्यक्रम शांती कमल सभागृहात आयोजित करण्यात आला होता. नरेंद्र नारखेडे यांनी सहकारी कारखाना पतसंस्था उपसा जलसिचन संस्था व राजकीय पक्ष पदावर व आध्यात्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली याबाबत हा पुरस्कार देण्यात येत असल्याची घोषणा आयोजन संघाचे अध्यक्ष कोळकर यांनी केले. यावेळी महाराष्ट्रातील सर्व पत्रकार बांधव उपस्थित होते. विशेष अतिथी म्हणून भाजपा राज्य प्रवक्ते अजित चव्हाण, संजय नवले, सुनील ढेपे, परब साहेब, डॉ. सुनील भावसार, हेमंत कुमार नेहते, शेखर चौधरी आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन सह्याद्री वहिनीचे निलेश परबत यांनी केले.


Protected Content

Play sound