धरणगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील भोणे येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक संपन्न झाली. यात चेअरमन पदी आबासाहेब अशोक पाटील यांची तर व्हाईस चेअरमन पदी लोटन अर्जुन पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
गावाने एकत्र येत सर्वांच्या सहकार्याने हि निवडणूक बिनविरोध पार पाडली. यात नवनियुक्त संचालक प्रशांत पाटील, दिलीप पाटील, रविंद्र पाटील, काशिनाथ पाटील, प्रकाश पाटील, राजेंद्र पाटील, मीराबाई सुभाष पाटील, अनिता योगेश पाटील, प्रतिभा दिनेश पाटील, साहेबराव शिंदे यांनी तसेच भाजप तालुका उपाध्यक्ष दिनेश पाटील, सुरेश जयराम पाटील, रोहित पाटील, सुनील पाटील, हरिष पाटील, विशाल पाटील यांनी देखील निवडणूक बिनविरोध करणेकामी तसेच चेअरमन व व्हाईस चेअरमन निवड बिनविरोध होण्यासाठी सहकार्य केले.
सोसायटीच्या निवडणुकीचे कार्य पार पाडण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून डी.एम.दुसाणे यांनी तसेच सोसायटीचे सचिव सी.बी.परिहार यांनी काम पाहिले. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात निवडणूक शांततेत पार पडली. कार्यक्रमाचा समारोप मान्यवरांच्या सत्काराने करण्यात आला.