रावेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील बोहर्डा येथे किरकोळ कारणावरुन दोन गटात हाणामारी झाल्याची घटना रविवारी रात्री घडली. या प्रकरणी रावेर पोलीस स्टेशनला परस्पर विरोधी गुन्हे दाखल झाल्याने बोहर्डा गावात एकच खळबळ उडाली आहे.
या बाबत वृत्त असे की, “बोहर्डा ता. रावेर येथील रविंद्र सिताराम उईके व अतुल अरुण वानखेड़े यांच्यामध्ये शाब्दिक बाचाबाची झाली आणि त्याचे रूपांतर हाणामारीमध्ये झाले. दोघी गटाचे नातलक एकमेकाला भिडले. यात लाठ्याकाठ्याने मारहाण करण्यात आली.
या प्रकरणी रविंद्र उईके यांनी दिलेल्या फिर्यादी वरुन अतुल वानखेडे, अरुण वानखेड़े, ललिता वानखेडे, सुवर्णा वानखेडे, ईश्वर तायडे यांच्याविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल केला आहे.
तर दूसरीकडे अतुल वानखेडे यांनी दिलेल्या फिर्यादी वरुन मयूर तायडे, दुर्गाबाई अढागळे, राहुल अढागळे, विशाल अढागळे, रविंद्र उईके, गोकुळ नाईके यांच्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
या गुन्ह्यांचा तपास पोहेकॉ अर्जुन सोनवणे करीत आहे.