Home क्राईम शाहू नगरातून मोटारसायकल लंपास

शाहू नगरातून मोटारसायकल लंपास


bike chori

जळगाव प्रतिनिधी । शाहूनगर येथील वृत्तपत्र विक्रेत्याची घरासमोर लावलेली मोटारसायकल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना 3 मे रोजी घडली होती याबाबत आज शहर पोलीसात अज्ञात चोरट्याविरोधात मोटारसायकल चोरी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, गणेश यशवंत चौधरी (वय – 27) रा. शाहुनगर यांनी आपली दुचाकी क्रमांक एमएच19 एएल 2390 होन्डा गाडी 3 मे रोजी रात्री घरासमोर लावली होती. दुसऱ्या दिवशी 4 मे रोजी मोटारसायकल लावलेल्या जागेवर मिळून आली नाही. त्यांनी शोधाशोध करण्याचा प्रयत्न केला मात्र ती मिळून आली नाही. मोटारसायकल चोरी गेल्या प्रकरणी गणेश कोळी यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीसात अज्ञान चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound