मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | आगामी राज्यसभा निवडणुकीत शिवसेना आपले दोन उमेदवार उतारणार असून कोणत्याही अपक्ष उमेदवाराला पाठींना देण्यात येणार नसल्याचे आज खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले.
शिवसेनेने खासदार संभाजीराजे छत्रपत यांना पक्षात प्रवेश करण्याची खुली ऑफर दिली असून त्यांनी मात्र याला प्रतिसाद दिला नसल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमिवर, शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलतांना महत्वाचे विधान केले.
खासदार संजय राऊत म्हणाले की, या निवडणुकीत आम्ही दोन उमेदवार निवडून आणणार असून दोन्ही उमेदवार विजयी होणार आहेत. यामुळे आम्ही कोणत्याही अपक्ष उमेदवाराला पाठींबा देणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. खासदार संभाजीराजे छत्रपती यांना पाठींबा देण्याबाबत त्यांनी बोलणे टाळले. मात्र अपक्ष उमेदवाराला पाठींबा दिला जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शिवसेनेने आज दुपारी बारा वाजेपर्यंत संभाजीराजे यांना मुदत दिली असून यात ते काय निर्णय घेतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.