…तर ओबीसी आरक्षण मिळाले असते : फडणवीस

नागपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | नवाब मलिक यांचे डी गँगसोबत संबंध असल्याचे न्यायालयाने निरिक्षण नोंदविल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे.

या संदर्भातील वृत्त असे की,  विशेष न्यायालयाने कालच ईडीने राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्याविरोधात दाखल केलेल्या आरोपपत्राची दखल घेतली. प्रथमदर्शनी मलिक हे प्रत्यक्षात सर्व माहिती असतानाही गोवावाला कंपाउंडसंदर्भातील आर्थिक गैरव्यवहारामध्ये (मनी लॉण्ड्रींग) सहभागी होते असं दिसत असल्याचे पुराव्यांवरुन स्पष्ट होतं, असे निरिक्षण नोंदवलं आहे.याबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे माध्यमांशी बोलतान प्रतिक्रिया दिली आहे.

फडणवीस म्हणाले की, न्यायालयाने नोंदविलेले निरिक्षण ही अत्यंत गंभीर बाब आहे. दोन वर्षे हे सरकार इम्पेरिकल डेटा तयार करण्याकरता, ओबीसी आरक्षणाकरता कुठलीही धडपड करत नाही. मात्र त्याचवेळी डी गँगशी संबधित जेलमध्ये असलेले नवाब मलिक मंत्रीमंडळात राहायला हवेत यासाठी सरकारची धडपड आपण पाहतोय. याच्यापेक्षा अर्धी धडपड इम्पेरिकल डेटा गोळा करण्यासाठी केली असती तर ओबीसी आरक्षण गेले नसते.

 

Protected Content