Home क्राईम पीएनबी बँक घोटाळा : मेहुल चोक्सीची 51 कोटींची संपत्ती जप्त

पीएनबी बँक घोटाळा : मेहुल चोक्सीची 51 कोटींची संपत्ती जप्त

0
50
mehul choksi
mehul choksi


mehul choksi
 

मुंबई (वृत्तसंस्था) पंजाब नॅशनल बँकेतील तेराशे कोटी रुपयांच्या घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोक्सीच्या गीतांजली ग्रुपच्या कंपनीची 151 कोटी रुपयांची संपत्ती सक्तवसुली संचालनालय ईडीने जप्त केली आहे. ईडीने ‘प्रिव्हेंशन ऑफ मनी लॉन्ड्रिंग अॅक्ट 2002’ या कायद्याखाली ही कारवाई केली आहे.

 

 

मेहुल चोक्सी आणि नीरव मोदीने पंजाब नॅशनल बँकेत 13 हजार 570 कोटींचा घोटाळा केला होता. मेहुल चोक्सी गीतांजली ज्वैलर्सचा पार्टनर आहे. त्यामुळे पीएनबी घोटाळ्यात नीरव मोदीसह चोक्सी देखील आरोपी आहे. यापूर्वी करण्यात आलेल्या कारवाईत लंडनमधील तुरूंगात असलेला आरोपी नीरव मोदी आणि त्याचा मामा मेहुल चोक्सी याच्या 13 आलिशान गाड्यांचा लिलाव करण्यात आला होता. ईडीने चोक्सीच्या 2 तर नीरव मोदीच्या 11 गाड्या जप्त केल्या होत्या. 22 फेब्रुवारी रोजी ईडीने नीरव मोदीचे 100 कोटींपेक्षा अधिक किंमतीचे शेअर, ठेवी गोठवून आलिशान गाड्या जप्त केल्या होत्या.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound