जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शेतातील ईलेक्ट्रिक डीपीवरून अज्ञात चोरट्यांनी १५ हजार रूपये किंमतीचे ॲल्यूमिनीयम तारांची चोरी केल्याची घटना समोर आली आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील लोणवाडी शिवारातील रविंद्र पोपट पाटील यांच्या शेतात महावितरण कंपनीची ईलेक्ट्रिक डी.पी. लावण्यात आली आहे. या डिपीवरून शेतकऱ्यांनी विजपंपासाठी वीजपूरवठा केला जातो. महावितरण कंपनीने या ठिकाणी ठेवलेले ॲल्यूमिनीअमच्या १५ हजार रूपये किंमतीच्या तारांची चोरी केल्याचे मंगळवार १७ मे रोजी सकाळी ८ वाजता उघडकीला आली.
याप्रकरणी महावितरण कर्मचारी संतोष विठ्ठल पाटील रा. महाबळ जळगाव यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून अज्ञात चोरट्यांविरोधात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून बुधवार १८ मे रोजी दुपारी १ वाजता अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार राजेंद्र उगले करीत आहे.