Home क्राईम जामनेरात जुगार्‍यांची पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांवर दगडफेक

जामनेरात जुगार्‍यांची पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांवर दगडफेक

0
28

जामनेर प्रतिनिधी । जुगार अड्डयावर धाड टाकण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर जुगार्‍यांनी जोरदार दगडफेक केल्याची धक्कादायक घटना येथे घडली आहे.

याबाबत वृत्त असे की, येथील इंदिरानगर परिसरात जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती पोलिसांना गस्तीवर असतांना मिळाली होती. यावरून पोलिसांचे एक पथक या ठिकाणी धाड टाकण्यासाठी गेले होते. या पथकात पोलीस निरिक्षक प्रताप इंगळे, उपनिरिक्षक विकास पाटील आदींसह अन्य जणांचा समावेश होता. पोलिसांचे पथक पाहून जुगार्‍यांनी पळ काढला. तथापि, पळून जाण्यात अयशस्वी झालेल्या आठ-दहा जणांनी पोलीस पथकावर तुफान दगडफेक केली. यात पोलीस निरिक्षक प्रताप इंगळे, उपनिरिक्षक विकास पाटील व कॉन्स्टेबल सुभाष माळी आदी जखमी झाले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी शासकीय कामकाजात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांनी दोन पथकांची नियुक्ती केली आहे. दरम्यान, थेट पोलिसांवरच दगडफेक करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound