Home क्रीडा ज्युनिअर हॉकी इंडिया राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल सायली खंडागळेचा गौरव

ज्युनिअर हॉकी इंडिया राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल सायली खंडागळेचा गौरव

5561134b 1cda 4740 82fa d52db7cb96c0
5561134b 1cda 4740 82fa d52db7cb96c0

5561134b 1cda 4740 82fa d52db7cb96c0

जळगाव (प्रतिनिधी) मुलींच्या नवव्या हॉकी इंडिया ज्युनिअर नॅशनल स्पर्धा कोल्लम (केरळ) येथे नुकत्याच पार पडल्या आहेत. त्यात महाराष्ट्र राज्याच्या संघात जळगाव जैन स्पोर्ट्स अकादमीची खेळाडू तथा एम.जे. कॉलेजची विद्यार्थिनी सायली रमेश खंडागळे हिने प्रतिनिधित्व केले होते. हॉकी जळगाव संघटनेतर्फे सचिव फारूक शेख यांच्या हस्ते हॉकी स्टिक देऊन सायलीचा आज (दि.८) गौरव करण्यात आला.

 

 

यावेळी तिचे प्रशिक्षक सैयद लियाकत अली यांचाही सत्कार करण्यात आला. सायलीने उपस्थित खेळाडूंना आपला अनुभव कथन केला.याप्रसंगी लियाकत अली सैयद, अब्दुल मोहसीन, मिरान शेख, तलहा मुनीब, श्रीकांत कवठेकर, मजाज खान, राहुल धुळंकर, सययद अबरार, भाग्यश्री कोळी, मोहिनी माली, सुनैना राजपाल, नूतन शेवाळे, दीपिका सोनवणे आदी उपस्थित होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound