जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | नानीबाई रूग्णालय परिसरातील जी. एम. डायग्नोस्टीक लॅब येथे माजी मंत्री तथा आ.गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत रक्त चाचण्या शिबीराचे आयोजन भारतीय जनता पार्टी जळगाव महानगर व जी. एम. फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानानाने करण्यात आले होते.
शहरातील गरजू रुग्णांसाठी जास्तीत जास्त १००० रुपये किमतीच्या रक्त चाचण्या मोफत करण्यासाठी या शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात ह्दयरोग, उच्च रक्तदाब, मधुमेह व थॅायरॅाइडच्या रूग्णांना फायदेशीर ठरतील असे रक्ताच्या २५५ चाचण्या मोफत करण्यात आल्या. या कार्यक्रम प्रसंगी आमदार राजूमामा भोळे, भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष दिपक सुर्यवंशी, विधान परिषद आमदार चंदुभाई पटेल, महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा उज्जवलाताई बेंडाळे, मनपा स्थायी समिती सभापती राजेंद्र पाटील, जिल्हा सरचिटणीस विशाल त्रिपाठी, डॉ.राधेश्याम चौधरी, विधानसभा क्षेत्र प्रमुख दिपक साखरे, जी एम डायगोनोस्टीकचे दिपक धवसे, लक्ष्मीकांत सोनवणे आदींच्या हस्ते शिबिराचे उदघाटन करण्यात आले. प्रास्ताविक जिल्हा सरचिटणीस डॉ. राधेश्याम चौधरी यांनी केले. आमदार राजूमामा भोळे यांनी शिबीर उद्घाटन प्रसंगी .गिरीष भाऊनी वैद्यकीय सेवा केलेल्या कार्याविषयी मत व्यक्त केले. महानगर जिल्हाध्यक्ष दिपक सुर्यवंशी यांनी गिरीषभाऊंचे वैद्यकीय सेवेतील योगदान व प्रेरणा विषयी मत व्यक्त केले. आभार जिल्हा सरचिटणीस विशाल त्रिपाठी यांनी मानले. या कार्यक्रमासाठी जी. एम. फाऊंडेशनचे रामेश्वर नाईक, अरविंद देशमुख, दिपक धवसे यांचे सहकार्य लाभले. यशस्वितेसाठी जयेश भावसार, प्रकाश पंडित, योगेश पाटील, भुषण भोळे आदिंनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष दिप्तीताई चिरमाडे यांनी केले. या कार्यक्रमप्रसंगी माजी महापौर सदशिवराव ढेकळे, जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप रोटे, माजी नगरसेवक पिंटू काळे, नगरसेविका दीपमाला काळे, नगरसेवक मयूर कापसे, आटो स्कूल आघाडीचे प्रमोद वाणी, अनुसूचित मोर्चाचे प्रल्हाद सोनवणे, अध्यात्मिक आघाडीचे हेमंत जोशी, प्रज्ञावंत आघाडीचे संजय पुरी, जेष्ठ नागरिक आघाडीचे सुरेश सोनार, शिक्षक आघाडीचे प्रविण जाधव, मंडल अध्यक्ष संजय लुल्ला, महिला मोर्चाच्या दिप्तीताई चिरमाडे, रेखार्ताई वर्मा, शोभाताई कुलकर्णी, सरोजताई पाठक, ज्योती तिवारी, पूजा पाटील, प्रज्ञा जोशी, मनोज काळे, सुनील काळे, अजय जोशी, प्रशांत सावंत, युवा मोर्चाचे मिलिंद चौधरी, राहुल पाटील, सुरज सरोदे, राहुल मिस्तरी, अश्विन सैंदाणे, रोहित सोनवणे आदी जिल्हा पदाधिकारी, नगरसेवक, प्रदेश पदाधिकारी, मंडल अध्यक्ष, मंडल पदाधिकारी, जिल्हा मोर्चा आघाडी, प्रकोष्ठ, पदाधिकारी, शक्ती केंद्रप्रमुख, बूथ प्रमुख व कार्यकर्ते यांनी उपस्थित होते.