जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । त्र्यंबकेश्वर येथील श्री स्वामी समर्थ गुरुपीठ येथे ५० कोटींचा अपहार झाल्याबाबत दोन जणांनी बेकायदेशीररित्या व्यक्तव्य केले आहे, या दोघांवर फौजदारी कारवाई करण्यात यावी, अशी मागणीचे निवेदन समस्त सेवेकरी यांनी यावल पोलीसांना मंगळवारी १७ मे रोजी दिले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, नाशिक येथील श्री स्वामी समर्थ मार्गाचे काम श्री परमपूज्य मोरेदादा व त्यांच्यानंतर सेवेकर यांच्या आधारस्तंभ असलेले परमपूज्य गुरुमाऊली हे ४७ वर्षांपासून अविरतपणे करत आहे. सदरील कामकाज अत्यंत पारदर्शकपणे सुरू आहे. असे असताना अमर रघुनाथ पाटील रा. शिवाजीनगर पुणे आणि चंद्रकांत गणपत पाठक रा. त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक यांनी कोणत्याही प्रकारे कायदेशीर बाबींचा विचार न करता वैयक्तिक स्वार्थापोटी खोटेनाटे अर्ज करून स्थानिक वर्तमानपत्रात श्री स्वामी समर्थ गुरुपीठात ५० कोटी रूपयांचा अपहार झाल्याचा व आदिवासींच्या जमिनीवरील बांधकामा बाबत जे बेकायदेशीर वक्तव्य केले आहे. त्यामध्ये कोणते प्रकारे सत्यता नाही, या वक्तव्यामुळे श्री स्वामी समर्थ भक्त परिवार यामध्ये प्रचंड रोष निर्माण झाला असून भक्तांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे सेवेकरींचे श्रद्धास्थान असलेले परम पूज्य गुरुमाऊली व मार्ग यांची बदनामी करून चुकीचा संदेश समाजात पसरण्याचे काम केले आहे. अशा वक्तव्य करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करून फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करावा, अशा मागणीचे निवेदन मंगळवारी १७ मे रोजी यावल तहसीलदार यांना निवेदन दिले. या निवेदनावर यशवंत भोगे, संगीता काटकर, किशोर श्रावगे, बेबी पवार, विकास चोपडे, संजय शिंपी शिरीष गडे, नीलेश करकरे, मनोज पाटील, गणेश बडगुजर, वैशाली नेरकर, सुनिता बारी, महेंद्र माळी, सुनील तावडे, अनिकेत सरोटे, मनोज बारी यांच्यासह आदी सेविका यांच्या स्वाक्षर्या आहेत.