Home Cities धरणगाव धरणगावात संगणक विभागाच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना भावपूर्ण निरोप

धरणगावात संगणक विभागाच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना भावपूर्ण निरोप

0
78

धरणगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | येथील पी. आर. हायस्कूल सोसायटी संचालित आर्ट्स, कॉमर्स अणि सायन्स कॉलेजमध्ये तृतीय वर्षातील कॉम्प्युटर सायन्स विभागाच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता.

 

निरोप समारंभात संगणक विभागाच्या व्याख्याता प्रा. पूर्वा कुलकर्णी या अध्यक्षस्थानी होत्या, त्यांनी सर्वांचे स्वागत व मार्गदर्शन केले. प्रा. मोमीन शेख सर व श्रद्धा चौटे यांनी सर्व विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन केले, सूत्रसंचालन प्रथम वर्षाचे विद्यार्थी जागृती पाटील व शुभम सोनवणे यांनी केले. या प्रसंगी तृतीय वर्षाचे विद्यार्थी पवन बडगुजर, आसिफ कुरेशी, ज्योत्स्ना पाटील व राजश्री पाटील यांनी मनोगत व्यक्त करतांना सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, प्राचार्य व व्यवस्थापन मंडळ यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमास विशेष उपस्थिती डॉ. ज्योती महाजन यांनी नोंदवली. प्रथम वर्षाचे योगेश महाजन अणि द्वितीय वर्षाचे घनश्याम पाटील यांनी मनोगत व्यक्त करतांना तृतीय वर्ष पूर्ण करून जाणार्‍या विद्यार्थ्यांना भावी आयुष्याबद्दल शुभेच्छा दिल्या. आभार ऋषिकेश चव्हाण यांनी मानले. इतर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी या कार्यक्रमास उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ. टी. एस. बिराजदार सरांचे मार्गदर्शन लाभले व प्रथम वर्षाचे व द्वितीय वर्षाचे सर्व विद्यार्थ्यांनी विषेश परीश्रम घेतले. यावेळी महाविद्यालयातील संगणक विभागाचे प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षाचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते.


Protected Content

Play sound