Home Cities जळगाव अल्पवयीन मुलीची गळफास घेऊन आत्महत्त्या

अल्पवयीन मुलीची गळफास घेऊन आत्महत्त्या

2597635 images232 jpeg jpegbf1cc40066fdb2c66402653e31392ed2
2597635 images232 jpeg jpegbf1cc40066fdb2c66402653e31392ed2

2597635 images232 jpeg jpegbf1cc40066fdb2c66402653e31392ed2

जळगाव (प्रतिनिधी) धरणगाव तालुक्यातील पाळधी येथील एका १७ वर्षीय मुलीने मध्यरात्री घरात गळफास घेऊन आत्महत्त्या केल्याची घटना घडली आहे. पहाटे २.३० वाजता हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी रामानंदनगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, कोमल संजय बारी (वय १७) राहणार पाळधी, तालुका धरणगाव, या मुलीने राहत्या घरातील सर्वजण झोपलेले असताना घरात गळफास घेऊन आत्महत्त्या केली. तिने गळफास घेतल्याचा प्रकार रात्री २.३० वाजेच्या सुमारास कुटुंबीयांच्या लक्षात आल्याने उघडकीस आला. तिला तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला मृत घोषित केले. याबाबत रामानंद नगर पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पो.हे.काँ. विकास देशमुख आणि पोलीस नाईक ललित भदाने करीत आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound