Home क्राईम अरेरे…बापाचा मृतदेह स्वीकारण्यास मुलाचा नकार !

अरेरे…बापाचा मृतदेह स्वीकारण्यास मुलाचा नकार !

0
33

जळगाव प्रतिनिधी । वेटर म्हणून काम करणार्‍या बापाचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा मृतदेह स्वीकारण्यास मुलाने नकार दिल्याची घटना नुकतीच घडली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, ६ मे रोजी गिरणा नदीजवळ एका ६० वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. याबाबत ग्रामीण पोलीस स्थानकातील कर्मचार्‍यांनी मृतदेह जिल्हा रुग्णालयात दाखल केला होता. त्यावेळी मयताची ओळख झालेली नव्हती याबाबत ग्रामीण पोलीस स्थानकात अनोळखी व्यक्तीचा महत्त्वाची अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. दरम्यान, पोहेकाँ मगन मराठे यांनी तपासाची चक्रे फिरवली असता मयताचे नाव धर्मराज असून तो भुसावळातील शेरे पंजाब हॉटेल आणि जळगावातील मराठा मटन हॉटेल याठिकाणी वेटरचे काम करत होता अशी माहिती मिळाली. यानंतर त्यांनी धर्मराजच्या मुलगा त्याचा मुलगा निखील उर्फ नितीन याचा क्रमांकदेखील मिळवला. त्याला व्हाटसअ‍ॅपवरून मृतदेहाचा फोटो पाठवून ओळखदेखील पटवली. नाशिक येथे राहणार्‍या निखीलने आपण वडिलांचा मृतदेह घेण्यासाठी उद्या येतो म्हणून सांगितले. मात्र तो आलाच नाही.

निखिल उर्फ नितीन हा नाशिक येथे कुटुंबासह राहतो त्याच्या आई आणि वडिलांचं काही वर्षांपूर्वी घटस्फोट झालेला असल्याने त्याने वडिलांचा मृतदेह घेण्यास नकार दिला. मयत धर्मराज वेटर याचा मृतदेह मुलगा नितीन देण्यास तयार नसल्याने खाकीतील माणुसकी दाखवत हवालदार मगन मराठे यांनी स्वखर्चाने मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. यासाठी मराठा मटन हॉटेलचे मालक विजय महाजन यांनी त्यांना सहकार्य केले. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ मगन मराठे करीत आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound