मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राष्ट्रवादीचे मंत्री मलिक यांना सत्र न्यायालयाने खाजगी रुग्णालयात उपचारासाठी परवानगी दिली आहे. त्यामुळे मलिक यांना न्यायालयाकडून तात्पुरता दिलासा मिळाला असला तरी सत्र न्यायालयाने मात्र वैद्यकीय कारणासाठी जामीन नाकारला आहे.
आर्थिक गैरव्यवहार मनी लॉड्रिंग आरोप प्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा मंत्री मलिक यांना सत्र न्यायालयाकडून तात्पुरता दिलासा देण्यात आला आहे. मंत्री मलिक यांच्या वकिलांनी वैद्यकीय जामिनासाठी विशेष न्यायालयात अर्ज केला होता. जामीन अर्जात मलिक यांना कोर्टाला किडनीच्या आजारांमुळे प्रकृती अस्वास्थामुळे पायांना सूज आली असून खासगी रुग्णालयात शस्त्रक्रियेसाठी परवानगी देण्याची मागणी करण्यात आली होती.
यावरून मंत्री मलिक यांना मुंबईत कुर्ला येथील क्रिटीकेअर रुग्णालयात उपचार घेण्यासाठी सत्र न्यायालयाने परवानगी दिली आहे. तसेच उपचारादरम्यान परिवारातील एका व्यक्तीला मलिकांसोबत उपस्थित राहण्याचीहि सवलत न्यायालयाने दिली आहे. मात्र असे असले तरी, न्यायालयाने मंत्री मलिक यांना वैद्यकीय कारणासाठी जामीन देण्यास नकार दिला आहे.