Home क्राईम पाचोरा येथील शेतातून बैल चोरी

पाचोरा येथील शेतातून बैल चोरी

0
30

पाचोरा प्रतिनिधी । बाहेरपुरा भागातील परधाडे रोडवरील अरुण सुखदेव विसावे या शेतकर्‍याचा माहेजी नाका वरील कोंबडी फॉर्म जवळच्या शेताच्या शिवारातून चोरट्याने बैल चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे.

याबाबत वृत्त असे की, शेतकरी अरुण सुखदेव विसावे यांनी माहेजी नाका रोडवरील कोंबडी फॉर्म जवळच्या शेताच्या शिवारात सुमारे ६० हजार रूपये किंमतीची बैलजोडी बांधली होती. सोमवारी सायंकाळी बैलांचा चारापाणी करून ते घरी परतले. मंगळवारी सकाळी शेतात गेल्यानंतर त्यांना बैलजोडीतील एक बैल चोरीला गेल्याचे आढळले. या बैलाची किंमत सुमारे ३० हजार रुपये आहे. या संदर्भात त्यांनी पाचोरा पोलिसांत तक्रार केली आहे. या घटनेमुळे शेकर्‍यांना पुन्हा चिंतेचे वातावरण पसरले आहे एकीकडे शेतकरी दुष्काळ व पाणी टंचाईग्रस्त असताना चिंताजनक झाला असून पावसानेही साथ दिली नाही तरी शेतकरी हा खंबीरपणे शेताच्या बांधावर भर उन्हात कष्ट करून दुष्काळी परिस्थिती मात करून आपले कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहे. तर दुसरीकडे भामटे त्यांना त्रस्त करत आहेत. याकडे पाचोरा पीक संरक्षण सोसायटीचे देखील दुर्लक्ष झालेले दिसत आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound