एआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवैसी यांनी औरंगाबाद दौर्यात औरंगजेबाच्या कबरीवर उपस्थिती लावली. यावरून संजय राऊत यांनी ओवैसी यांच्यावर टीका केली आहे. याबाबत आज बोलतांना राऊत म्हणाले की, एमआयएमचे नेते ज्याला रितीरिवाज म्हणत आहेत, ते रितीरिवाज नाहीत. वारंवार महाराष्ट्रात यायचं आणि औरंगजेबाच्या कबरीसमोर गुढगे टेकून आम्हाला खिजवायचा प्रयत्न करायचा. पण औरंगजेबाला कबरीत आम्ही टाकलं. २५ वर्षे तो महाराष्ट्रात मराठ्यांशी लढत राहिला. कधीतरी तुम्हाला ही त्याच कबरीत जावं लागणार आहे, असं राऊत यांनी म्हटलं.
औरंगजेब सुफी संत नव्हता. त्याने महाराष्ट्रावर आक्रमण केले. छत्रपतींच्या मराठ्यांची त्यांच्यासोबत मोठी लढाई झाली आहे. आता हे ओवैसी मंडळी आम्हाला चॅलेंज वगैरे देत आहेत. आम्ही ते स्वीकारतो. तुम्ही लोक औरंगजेबाचे भक्त आहात. त्यामुळे तुमचेही लवकरच त्याच्यासारखे हाल होणार, अशा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.