जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | शहरातील विविध भागात दुषित पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे.यापार्श्वभूमीवर आयुक्तांनी आज उमाळा जलशुद्धीकरण केंद्रास भेट देवून सत्य परिस्थिती जाणून घेतली.
काल बुधवार दि. ११ मे रोजी राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने शहरात होणाऱ्या दुषित पाणीपुरवठा बाबत तक्रार आयुक्त वर्षा गायकवाड यांच्याकडे केली होती. यावेळी त्यांनी दुषित पाण्याच्या बाटल्या आयुक्तांना भेट देवून ही समस्या तत्काळ सोडविण्याची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर आज आयुक्त विद्या गायकवाड यांनी मनपाच्या उमाळा येथील जलशुद्धीकरण केंद्रास भेट देवून केंद्राची पाहणी केली. जलशुद्धीकरण केंद्रातील १२०० मी. मी. व्यासाच्या व्हाल्वाचा गिअर नादुरुस्त झाल्याने पाणीपुरवठ्यात व्यत्यय आला होता. हा नादुरुस्त गिअर औरंगाबाद येथून आणून तत्काळ आज सकाळी आणून बसविण्यात आला व पाणीपुरवठ्यातील व्यत्यय दूर करण्यात आला. या भेटीत आयुक्त विद्या गायकवाड यांनी संपूर्ण पाणी शुद्धीकरण प्रक्रियेची संपूर्ण माहिती जाणून घेतली. शुद्ध पाणी स्वतः पिऊन खात्री करून घेतली. जलशुद्धीकरण केंद्रातील अमृत पाणीपुरवठा योजनेतील कामातील अडचणी समजून घेतल्या. या अडचणी सोडवण्यासाठी त्यांनी सहमती दर्शविली.