पहूर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर शिवारातील पहूर कसबे येथील शेतातून पाणबुडीची मोटार अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, “ईश्वर मोतीलाल बनकर (वय-३८) रा. पहूर कसबे ता. जामनेर यांचे कसबे शिवारात शेत आहे. शेती करून आपला उदरनिर्वाह करतात. २५ एप्रिल रोजी सकाळी ९ ते २६ एप्रिल रोजी सकाळी ९.३० वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला आहे.
हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी पहूर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.” पुढील तपास पोहेकॉ जवानसिंग राजपूत करीत आहे.