यावल – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । येथील युवा कार्यकर्ते व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर उपाध्यक्ष आबिद कच्छी यांनी भोंग्याच्या राजकारणाला कंटाळून पक्षाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.
सद्या राज्यात गोंधळ निर्माण करणाऱ्या भोंग्याच्या विषयावरून राजकारण तापले असतांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील अनेक अल्पसंख्या कार्यकर्ते व पदाधिकारी हे पक्षाला सोडचिट्टी देतांना दिसत असुन आज यावल येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या खरेदी विक्री संघाच्या व्यापारी संकुलनातील संपर्क कार्यालयात राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष प्रा. मुकेश येवले , पक्षाचे जिल्हा प्रवक्ते तथा माजी नगराध्यक्ष अतुल पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस आदीवासी आघाडीचे जिल्हाध्यक्ष एम. बी. तडवी, राष्ट्रवादीच्या ओबीसी आघाडीचे तालुका अध्यक्ष निवृत्ती धांडे, सईद शेख रशीद, शहराध्यक्ष करीम मन्यार, कामराज घारू, युवक राष्ट्रवादीचे गोलु माळी, आरीफ खान, विजय साळी, अय्युब खान, मोहसीन खान आदी पक्षातील कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कच्छी यांनी पक्षात राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला असुन अतुल पाटील, मुकेश येवले व आदी पदाधिकाऱ्यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले आहे.