झाडावरून पडल्याने तरूणाचा उपचारादरम्यान मृत्यू

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जांभूळ तोडतांना फांदी तुटल्याने जमिनीवर पडल्याने गंभीर जखमी झाले. आज पहाटे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, ज्ञानेश्वर सुकदेव सकट (वय-२२) रा. हरीविठ्ठल नगर रोड राजीव गांधी नगर जळगाव, हा तरूण आपल्या आईवडील व दोन भावांसह वास्तव्याला आहे. ज्ञानेश्वर सकट हा महापालिकेत ठेकेदाराकडे वॉटरग्रेसवर गेल्या दोन वर्षांपासून कामाला होता. शनिवारी ७ मे रोजी रामानंदनगर येथील गिरणा टाकीजवळील एका जांभळाच्या झाडावर उभा होता. दरम्यान, झाडाला जांभळी लागल्याने ते तोडण्यासाठी झाडावर चढला. त्यात झाडाची फांदी तुटल्याने ते थेट जमिनीवर पडले. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. रविवारी ८ मे रोजी रात्री २.३० वाजता त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याबाबत रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत ज्ञानेश्वर सकट यांच्या पश्चात आई मंगलाबाई, वडील सुकदेव पंडीत सकट आणि आकाश आणि प्रकाश हे दोन भाऊ असा परिवार आहे.

 

Protected Content