मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा – राज ठाकरे यांच्या औरंगाबाद सभेनंतर राज्यात सर्वच स्तरावर शांतता भंग झाली असून धार्मिक सामाजिकदृष्ट्या वातावरण बिघडले आहे, त्यामुळे त्यांच्या विरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यासाठी न्यायालायात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.
राज ठाकरे यांनी हनुमान चालीसा पठन मुळे राज्यात विविध भागात सामाजिक वातावरण बिघडले आहे. प्रक्षोभक भाषण करणाऱ्या राज ठाकरे यांच्या विरोधात औरंगाबाद शहर पोलीस ठाण्यात कारवाईस्तव गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
भोगे हा विषय एक दिवसाचा नसून जो पर्यंत उतरत नाहीत तोवर हनुमान चालीसा सुरूच राहणार असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले आहे, त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे याच्या प्रक्षोभक भाषण करून वातावरण बिघडवू पाहणाऱ्या आगामी पत्रकार परिषद, सभा, अन्य शहरांच्या भेटी आदी कार्यक्रमावर बंदी घालावी, तसेच त्याच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात यावेत, यासाठी मुंबई उच्च न्यायालयात इंडिया अगेन्स्ट करप्शन तर्फे जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.