अमळनेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील शिरसाळे येथे हिंदू व मुस्लिम समाजाने एकत्रित येऊन रमजान ईद साजरी केली. याप्रसंगी सामाजिक एकोपा जपत शिरखुर्मा पार्टीचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमास गावातील सरपंच युवराज पाटील, पोलीस कर्मचारी संजय शिरोळे, पोलीस पाटील प्रदीप चव्हाण, जगतराव पाटील, सुदाम चौधरी, रामचंद्र चौधरी, प्रवीण महाले, अलाउद्दीन शेख ,इमरान शेख, निसार शेख, आरिफ शेख, फिरोज शेख, कलीम शेख, दानिश शेख अल्ल्युद्दिन खाटीक, रौफ मिस्त्री, विपुल चौधरी, गोरख पाटील आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
गावातील सर्व समाजातील ग्रामस्थांनी एकत्र येत जाती पाती आणि धर्माचे राजकारण करणाऱ्यांना या अनुषंगाने एकत्रित येवून ईद साजरी करत एकात्मतेचा संदेश दिला.