Home Cities जळगाव बिअर शॉपी फोडून मुद्देमाल लांबविला

बिअर शॉपी फोडून मुद्देमाल लांबविला


जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील चिंचोली येथील बिअर शॉपी फोडून दुकानातील ७२ हजार रूपये किंमतीचे दारूचे बॉक्स चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

सविस्तर माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील चिंचोली येथील सागर वासूदेव लाड (वय-२४) यांचे गावातील हॉटेल सायलीच्या मागे सागर बिअर शॉपी आहे. ३ मे रोजी रात्री १० वाजता नेहमीप्रमाणे शॉपी बंद करून घरी गेले. दरम्यान, मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी बिअर शॉपी फोडून सुमारे ७२ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला. हा प्रकार ४ मे रोजी सकाळी १०.३० वाजता उघडकीला आला. सागर लाड यांनी तात्काळ एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अनिस शेख करीत आहे.


Protected Content

Play sound