मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नीच्या नांवे असलेल्या कोलई गावातील त्या १९ बंगल्याच्या गैरव्यवहार संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे भाजपचे किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी त्यांच्या पदाचा गैरवापर करीत मुरुड तालुक्यातील कोलई गावातील १९ बंगल्यासोबत सुमारे साडे नऊ एकर जमीन रश्मी ठाकरे यांच्या नावावर घेतली आहे. या जमिनीची किमत अंदाजे साडेपाच कोटीच्या जवळपास असून एप्रिल २००९ ते मार्च २०२१ दरम्यान या जमीन व बंगल्याचा कर भरणा केलेला आहे. पण आयकर विभागाकडे याची माहितीच दिली नाही. ते १९ बंगले अचानक बेपत्ता झाले. यासंदर्भात सोमय्या यांनी कोलई येथील कथित १९ बंगले घोटाळा संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार असल्याचे सोमय्या यांनी म्हटले आहे.