जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना समोर आली आहे. याबाबत पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, अभिजित विनायक कोचूरे (वय-२२) रा. महाविर नगर, दुध फेडरेशन हा तरूण आई, वडिलांसह वास्तव्याला आहे. दरम्यान, दुचाकीने ते पहूर येथून जळगावकडे येत असतांना गाडेगाव येथील सुप्रिम पाईप कंपनीजवळ भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनाने जोरदार धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी ३ मे रोजी पहाटे ३ वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान, काही वाहनधारकांनी तातडीने खासगी वाहनाने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. याबाबत जळगाव तालुका पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील प्राथमिक तपास अनिल फेगडे करीत आहे.