भडगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । घर खाली करण्याच्या कारणावरून महिलेला विषारी औषध पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, निला अरूण देवरे (वय-५३) रा.श्रमीक नगर नाशिक, ह.मु. देव्हारी कनाशी ता. भडगाव या महिला आपल्या पती व कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. त्यांनी त्यांचे घर अजबराव हिलाल पाटील यांना भाड्याने दिले आहे. २९ एप्रिल रोजी निला देवरे यांनी अजबराव पाटील यांना घर खाली करून द्या असे सांगितले. याचा राग आल्याने अजबराव हिलाल पाटील, रोहिदास अजबराव पाटील आणि विकास बाबुराव पाटील तीन्ही रा. देव्हारी कनाशी ता भडगाव यांनी विवाहितेला विषारी औषण पाजून जीवेठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. तर तिचा पती अरूण देवरे याला देखील बांबूने मारहाण करून गंभीर दुखापत केली आहे. विवाहितेचा अत्यवस्थ वाटत असल्याने तिला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दयाप्रकरणी विवाहितेच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी अजबराव हिलाल पाटील, रोहिदास अजबराव पाटील आणि विकास बाबुराव पाटील तीन्ही रा. देव्हारी कनाशी ता भडगाव या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रसेन पालकर हे करीत आहे.