जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील पिंप्राळा हुडको परिसरात रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडीया आणि समता सैनिक दलच्यावतीने कामगार दिनाच्या निमित्ताने बांधकाम कामगार नोंदणी शिबीराचे उद्घाटन करण्यात आले.
याबाबत माहिती अशी की, राज्यात महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. यावेळी विविध संघाटनांच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. याच अनुषंगाने रविवार १ मे रोजी सकाळी ११ वाजता शहरातील पिंप्राळा हुडको येथील जिल्हा परिषद शाळेसमोर रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडीया आणि समता सैनिक दलाच्या वतीने बांधकाम कामगार साठी नोंदणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी दुपारपर्यंत जवळपास ४० कामागारांनी नोंदणीचे अर्ज दाखल करण्यात आले.
नोंदणी शिबीराचे उद्घाटना उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाल जवळपासू २ हजार कामागारांना भारतीय संविधान प्रास्तविकाचे प्रत वितरण करण्यात आली. याप्रसंगी रिपाईचे प्रदेश उपाध्यक्ष तथा समता सैनिक दलाचे जिल्हाध्यक्ष विजय निकम, सुरेश सोनवणे, शोभा बारी, नगरसेवक हसीनाबी शेख, माजी नगरसेवक जाकीर पठाण, विनोद निकम, मोहम्मद नुर, बंटी बारी, सफी शेख, सचिन सोनवणे, सुनिल सुरवाडे यांच्यासह आदी उपस्थित होते.