Home क्राईम गोडावूनमधून २४ क्विंटल गव्हाची चोरी; पोलीसात गुन्हा

गोडावूनमधून २४ क्विंटल गव्हाची चोरी; पोलीसात गुन्हा

0
111


धरणगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्‍यातील पिंपळे शिवारात असलेल्या गोडावूनमधून चोरट्यांनी ५० हजार रुपये किंमतीचे २४ क्विंटल गहू चोरुन नेल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धरणगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विनोद प्रकाश पाटील (वय-३७) रा. पिंपरी खुर्द ता. धरणगाव हे व्यापारी आहेत. त्यांचे धरणगाव तालुक्यातील चोपडा रोडवरील पिंपळे गावाजवळ शगुन कॉटेक्स जिनिंग कंपनीचे गोडावून आहे. याठिकाणी त्यांनी २४ क्विंटल गहू इतर सामान ठेवलेला आहे. दरम्यान २६ एप्रिल ते २७ एप्रिल दरम्यान मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी ५० हजार रुपये किमतीचे ४० कट्टे असा २४ क्विंटल गहू चोरून गेला. हा प्रकार बुधवारी २७ एप्रिल रोजी सकाळी ४ वाजता समोर आला. याप्रकरणी विनोद पाटील यांनी धरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक प्रदीप पवार करीत आहे.

 


Protected Content

Play sound