Beating : जावयाकडून सासूला मारहाण, गुन्हा दाखल

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जावयाला पैसे दिले नाही म्हणून सासूला शिवीगाळ करून मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत नशिराबाद पोलिस ठाण्यात जावयाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

 

याबाबत माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील नशिराबाद गावाजवळ असलेल्या मन्यारखेडा गावात बालीबाई भारमल राठोड (वय-४२) ह्या आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. दरम्यान त्यांची मुलगी ही जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनीत संतोष बबलू पवार यांना दिले आहे. २६ एप्रिल रोजी सकाळी ५.३० वाजता जवाई संतोष पवार हा सासुबाई राठोड यांच्याकडे पैसे मागण्यासाठी आला होता. त्यावेळी पैसे देण्यास नकार दिल्याच्या कारणावरून संतोष पवार याने शिवीगाळ करून काठीने सासू बालीबाई राठोड यांना मारहाण करून पळून गेला. दरम्यान बालीबाई राठोड या जखमी अवस्थेत नशिराबाद पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून जावई संतोष पवार यांच्या विरोधात नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार रवींद्र तायडे करीत आहे.

Protected Content