Home Cities अमळनेर प्रा .जयश्री साळुंकेंच्या वाढदिवसानिमित्त श्रमदान ! (व्हीडीओ)

प्रा .जयश्री साळुंकेंच्या वाढदिवसानिमित्त श्रमदान ! (व्हीडीओ)


ed9224a2 cb07 404d 8660 22575ad08fdb

अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर महिला मंचच्या सदस्य प्रा.जयश्री साळुंके-दाभाडे यांच्या वाढदिवसानिमित्त आज अनोरे या गावी महिला मंचच्या सदस्यांनी सकाळी 7 ते 11 श्रमदान केले. अमळनेर तालुक्यातील हा पहिलाच महिलांचा ग्रुप आहे, जो मागील वर्षा पासून सातत्याने श्रमदानासाठी सहभागी होत आहे.

 

 

अमळनेर महिला मंचच्या सदस्य प्रा जयश्री साळुंके दाभाडे यांचा वाढदिवस होता. यानिमित्त अनोरे येथे श्रमदान करून हा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी गावातील ग्रामस्थ, महिला, मुले मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी केक कापून टाळ्यांच्या गजरात वाढदिवस साजरा केला. या प्रसंगी उपस्थित ग्रामस्थांना मिठाई वाटप करण्यात आली. तसेच विविध गाणे म्हणून श्रम करणाऱ्यांचा उत्साह वाढविला. यात आता उठवू सारे रान,साथी हाथ बढाना,काळ्या मातीत मातीत आदी गाणे अपेक्षा पवार यांनी म्हटले. या प्रसंगी डॉ अपर्णा मुठे, प्रा जयश्री साळुंके,कांचन शहा,मेधा कुलकर्णी, योगिता पांडे,अपेक्षा पवार ,चंदा वैद्य इ मंचाच्या महिला उपस्थित होत्या. तर गावातील अनेक महिलांसह सरपंच, उपसरपंच व इतर नागरीक उपस्थित होते.

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound