Home Uncategorized अक्षय तृतीयेच्या पूर्वसंध्येला गजबजली भुसावळ बाजारपेठ (व्हिडीओ )

अक्षय तृतीयेच्या पूर्वसंध्येला गजबजली भुसावळ बाजारपेठ (व्हिडीओ )

0
71

WhatsApp Image 2019 05 06 at 3.53.35 PM

भुसावळ (प्रतिनिधी) भुसावळ बाजारपेठेमध्ये अक्षय तृतीयानिमित्त नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केली. अक्षय तृतीयाच्या पूर्वसंध्येला आज बाजारपेठेमध्ये नागरिकांनी आंबा, घागर यासह विविध वस्तू खरेदी करण्याकडे कल दिसून आला.

 

हिंदू धर्मामध्ये साडे तीन मुहूर्तापैकी  एक असलेल्या अक्षय तृतीयेचा सण असल्याने त्यास अनन्य साधारण महत्व प्राप्त आहे.अक्षय तृतीयच्या शुभमुहूर्तावर नागरिक खाद्यपदार्थांसह विविध वस्तूंची खरेदी करीत असतात. यावर्षी सोन्याच्या भावामध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाली असल्यामुळे नागरिकांनी विविध सोन्याच्या वस्तू खरेदी करण्यावरही भर दिला असल्याचे दिसून आले आहे. अक्षय तृतीया च्या पूर्वसंध्येला या मुहूर्तावर नवीन गाडी, घर, कपडे खरेदी करण्याचा प्रघात असून काहींनी आज अक्षय तृतीयेच्या पूर्वसंध्येवर मोटरसायकल बुक केली असून त्याची डिलिव्हरी उद्या घेणार असल्याचे काही नागरिकांनी सांगितले.

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound