Home क्राईम मोबाईल हिसकावून दुचाकीस्वारांनी काढला पळ

मोबाईल हिसकावून दुचाकीस्वारांनी काढला पळ


mobilechorirp
 

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील विद्युत कॉलनी परिसरात राहणारे एक गृहस्थ रविवारी रात्री घराबाहेर मोबाईल पाहत उभे होते. त्याचवेळी दुचाकीवर आलेल्या तिघांनी त्यांचा मोबाईल हिसकावून पळ काढला.

 

या संदर्भात अधिक असे की, विद्युत कॉलनीत राहणारे जितेंद्र पुंडलीक चौधरी (वय-५३) हे रविवारी रात्री ११.३० वाजता घराबाहेर उभे राहून मोबाईलवर मेसेज पाहत होते. तेवढ्यात दुचाकीवर आलेल्या १८ ते २२ वयोगटातील तिघांनी त्यांचा मोबाईल हिसकावून धूम ठोकली. याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात नोंद करण्यात आली असून तपास गोपाळ चौधरी करीत आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound